व्यथा शेतकर्याची
व्यथा शेतकर्याची
पाणी नाही पाऊस नाही पीकं गेली जळून
बी गेलं बीयाणं गेलं औषधाची फवारणी करून
सांगा आता जगायचं कस???
नाही कुठलं पेंशन नाही कुठला पगार
जळलेली पीकच होती पोटाचा आधार
सरकार झालं आमच्यावर खुश मात्र निसर्ग का रूसला
कर्जमाफी करुन वर्षभरासाठी पोटाला चिमटा दिला
अन् सांगा आता जगायचं कस??
होत नव्हतं सार होरपळून गेलं
पोरांच शिक्षण बस;पण पोरीचं लगीन आलं...
घरातही असतात अनेक दुखणे
पाऊसामुळे आले आता जीवाला मरणे...
अन् सांगा आता जगायचं कस???
नाही दोष देत सरकारला की निसर्गाला
नशिबातच आमच्या रडगाणं..
पिढ्यानंपिढ्या मातीतच गेल्या
हेच आमचगार्हाणं...
सांगा आता कस जगायच???
मोडुन पडलेला संसार आता आमची
लेकरं उभी करणार
चांगल शिकुन तेही आता officer व्हणार
काळ्या आईची सेवा करता करता शिक्षणाचे दिवे पेटवणार
अन् शेतकर्याची पोरं आता शेतकरी नाही व्हणार...
शेतकर्याची पोरं आता शेतकरी नाही व्हणार....