आमचा स्वातंत्र्य दिन
आमचा स्वातंत्र्य दिन
उजाडला 15 ऑगस्ट दिन
चहूकडे जाहला आनंदी आनंद
गाऊन वंदे मातरम गीत
येऊ तिरंग्यास वंदन करून
आज आहे आमचा स्वातंत्र्यदिन
सर्वीकडे गुंजुन येतात कानी
फक्त देशभक्तीवरील गाणी
आठवतात फक्त आजच आम्हास
भगतसिंग राजगुरूची कहाणी
होते त्यांचे स्वप्न एक
जाती भेद नष्ट करून
गुण्यागोविंदाने होवू एक
मिळेल तेव्हा खरे स्वातंत्र्य कारण,
आज आहे आमचा स्वातंत्र्य दिन
मायमाऊलींनाही मिळाले या दिनी स्वातंत्र्य
पण तरी का?
आजच्या सावित्रीला बाहेर राक्षसांचा धाक
जोतीच्या सावित्रीवर शेण, गोळे फेकून केला उपहास
आताच्या सावित्रीवरही पेट्र
ोल रॉकेल ऍसिड फेकून होतो अत्याचार
कधी होईल ती सुरक्षित?
कधी होईल ती स्वतंत्र?
कसे म्हणू मी?
आज आहे आमचा स्वातंत्र्य दिन
वाटे फुलनदेवी होवून दाखवावे डेरिंग
राणी लक्ष्मीसारखी तलवार हातात घेऊन
कापून टाकावे नराधमांचे शीर
व्हावे इंदिरा गांधींसारखे पंतप्रधान
करून दाखवावे भारताचे नेतृत्व
मनात येई असे बरेच विचार
कारण आज आहे आमचा स्वातंत्र्य दिन
अगोदर होते इंग्रजांचे राज्य
आता कोरोनाने केले राज्य
देशात घालून थैमान
वाटे बापूसारखी देऊ घोषणा करून
चले जाव म्हणून सांगू खडसावून
उगवेल परत सोनियाची सकाळ
कारण आज आहे आमचा स्वातंत्र्य दिन