रक्षाबंधन
रक्षाबंधन
श्रावण महिन्यातील आला रक्षाबंधन सण
येई भाऊरायाची आठवण
वाटे द्यावे सर्व सोडून
यावे त्याची भेट घेऊन
श्रावण महिन्यातील आला रक्षाबंधन सण
मार्च महिन्याच्या लॉकडाऊनपासून भेट झाली नाही माझ्या माहेरच्यांची
वाटे राखीच्या निमित्ताने होईल भेट माझ्या भाऊरायाची
पण निराश झाले मन आणखी वाढले लॉकडाऊन
कधी होईल ओव्हर, माहेरच्यांची लागली ओढ
श्रावण महिन्यातील आला रक्षाबंधन सण
भावाच्या रूपात आहेत माझेही इथे दिर.
म्हणतात वहिनीच्या रूपात मिळाली आम्हालाही एक बहीण
जातात त्यांचे हे शब्द भावून
श्रावण महिन्यातील आला रक्षाबंधन सण
कोरोनाग्रस्त भावांना आहे माझा संदेश
कोरोना नावाच्या युद्धाला नका जाऊ भिऊन
दाखवू त्याच्यावर मात करून
जाऊ आपण जिंकून
शेवटी तोच जाईल भिऊन
म्हणेल, गेलो भारतातील बांधवाजवळच हरुन
उजाडेल नक्की तो दिवस
करू एकत्र साजरा रक्षाबंधन सण
श्रावण महिन्यातील आला रक्षाबंधन सण
येई भाऊरायाची आठवण