निरोप बाप्पाला
निरोप बाप्पाला
1 min
396
लंबोदर पितांबर देते तुला निरोप
कैलासावर आज तू सुखरूप पोहोच
माता पार्वती तुझी आठवण करत
येईल माझा उमा नंदन परत
आगमनाने वाटे तुझ्या भरलेलं घर
दर्शन होता तुझे होई प्रसन्न मन
लाडू-मोदकाने असे भरलेलं ताट
होता दहा दिवस फक्त तुझा थाट
तुझ्यामुळे वाटे पूर्वीसारखी सृष्टी
चुहुकडे होती फक्त तुझी कृपादृष्टी
तुझ्यामुळे जणू स्वर्ग माझे घर
निरोप देते तुला कधी येशील परत
