असावे आपलेही राजगृह
असावे आपलेही राजगृह
1 min
456
असावे आपलेही एक राजगृह
त्यांत असावी खेळत आपली लेकरं.
त्रिसरण पंचशील घेऊन
करू दिनचर्येचा प्रारंभ
लावून बुद्धधम्माची अखंड ज्योत
असावे आपलेही राजगृह
त्या राजगृहात भीवा रमाई करू आपण संसार
बाळ राजरत्नासारखे असावे आपलेही बाळ
प्रधन्या शील करूणेची देऊ त्याला शिकवण
घालून बुद्धधम्मची सांगड
असावे आपलेही राजगृह
त्या राजगृहात विजयादशमी दिनी
साजरा करू धम्मचक्र प्रवर्तन दिन
चौदा एप्रिल दिनी येईल
भीमस्तुती ओठांवर
घालून बाबासाहेबांच्या विचारांचे आभुषण
करू संपूर्ण विश्व निळसर
असावे आपलेही एक राजगृह