डोळे
डोळे
माझ्या डोळ्यांची गाथा
मी काय तुला सांगु
असुनही डोळे माझे पण
न असणा-या सारखे ।
डोळे हे माझे खुप काही बोलतात
गप्प राहुन सुद्धा मनातले सर्व,
डोळ्यातुनच झळकतात
जणु लुक लुकणा-या काजव्या प्रमाणे
केशरी तांबुस किरणे सुर्यांची
माझ्या डोळ्यांच्या वाटेतुन,
माझ्या मनामधे घर करुन साठवतात
तेव्हा या डोळ्यांची पारख होते सातत्यात........
डोळ्यातील माझ्या अश्रूंचा
काय मोल असेल कोणाला?
अनमोल ते अश्रु घळ घळतात
माझ्या दोन्ही गालावरती माझ्या भावना वाहतात........
मिटेल मी जेव्हा माझे डोळे शेवटच्याक्षणी,
तेव्हा प्रयत्न तुझेही असतील माझ्या
दोन्ही डोळ्यात झाकण्याचा,
पण माझे डोळे तुला बघु शकणार नाही.........
कारण दूर कुठेतरी क्षितीजाच्या पलीकडे
निघुन गेले असेल मी,
माझे सर्व काही
त्या डोळ्यात समावून.....