निष्पर्ण
निष्पर्ण


माझ्या निष्पर्ण देहावरून
तुम्ही मला मृत समजत असाल
तरी मी तुम्हाला दोष देणार नाही
तुम्ही मला सोडून जाऊ शकता
मी तुम्हाला मुळीच अडवणार नाही
वेळ आल्यावर सावलीही साथ देत नाही
हे मी पुरतं ओळखून आहे
मला अशा आहे पुन्हा ऋतू बदलतील
मी फुलेन, फळेन, बहरेन
पक्षी घरटी बांधतील, अंडी उबवतील
तेव्हा तुम्ही माझ्या सावलीला येऊ शकता
मी तुम्हाला मुळीच अडवणार नाही