STORYMIRROR

Sunjay Dobade

Others

3  

Sunjay Dobade

Others

सूर्य

सूर्य

1 min
3.5K


सूर्य त्याच्या नियमांनी उगवत राहिला, मावळत राहिला

आपल्याच तेजाने तळपत राहिला

जगाला उजेड देण्याचा त्याचा उद्देश असेलही, नसेलही

मी त्याचे उपकार स्मरत राहिलो

देव बनून त्याला पुजत राहिलो


तुम्ही त्याला ‘ग्रह’ बनवून

कुंडलीच्या बारा घरांत बंदिस्त करत

मला भिववत राहिलात, कधी लुबाडत राहिलात



साहित्याला गुण द्या
लॉग इन