STORYMIRROR

Sunjay Dobade

Tragedy

0.8  

Sunjay Dobade

Tragedy

गड्या आपला गावच बरा

गड्या आपला गावच बरा

1 min
19.1K


गावच्या आडवाटेने चालताना

काटे मोडून 'कुरूप' झालेले

माझे पाय नकार देतात

शहरातील गुळगुळीत रस्त्यावरून

चालायला!


अंधाराला सरावलेले माझे डोळे

दिपतात तुझ्या घरातील

हजार वॅट्सच्या

भगभगीत झुंबराने


मी कसा विसरू

आंब्याच्या गार सावलीला बसून

खाल्लेली ती कांदा भाकर

तिची सर नाही येत

तुझ्या तुपात भिजलेल्या पोळीला


घामाने न्हालेलं अंग जमिनीवर टेकताच

झोपेची सवय होती

मला टोचतेय तुझी

डनलॉपची गादी

मातीत लोळणारी माझी गोधडीच

ठीक होती मला अडाण्याला


माफ कर पोरा

फारच स्पष्ट बोलतोय मी

पण तुझ्या सुखासीन शहरी जीवनाचा

आता फारच कंटाळा आलाय

जीव गुदमरून टाकणार्या शहरापेक्षा

गड्या आपला गावच बरा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy