STORYMIRROR

Prashant Shinde

Tragedy

4  

Prashant Shinde

Tragedy

पोळणे

पोळणे

1 min
482

पोलणे...(पोळले अर्थात भाजणे)


पोळले जरी हात माझे

मी हार मानणार नाही

झाला केला जरी घाट कोणी

मी मागे हटणार नाही

सत्कार्याच्या वाटेवरती भेटले काटे

तरी मागे मी फिरणार नाही

याच जन्मी याच देही

सत्कर्म केल्यावाचून मी राहणार नाही

पेटतील वणवे पेटतील आगी

तरी मी घाबरणार नाही

जाती पाती धर्माच्या जेरी पेटल्या मशाली

तरी त्या शांत केल्याशिवाय मरणार नाही

जन्म माझा कृथार्थ करण्या

प्रयत्न सार्थकी लावण्यापासून 

मी कधीच परावृत्त होणार नाही

आग पेटती देश सेवेची अशी हृदयी

फुलवत सदैव राहीन सदा जीवनी

सुजलाम सुफलाम उज्जल उन्नत्त

करण्या आपली समृद्ध अवनी.....!


©प्रशांत शिंदे,कोल्हापूर

Prashants9606@gmail. com

8007740679



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy