दुष्काळ
दुष्काळ
अरं दुष्काळ दुष्काळ काय सांगू बाबा तुला
माणसानं माणसाचा हातानं केलया.
पूर्वी होती माणसं सोन्यासारखी
वृक्षावर माया करी जपे लेकरासारखी
आजची माणस राक्षस त्यापरी बरी
बेसुमार वृक्षतोड करी
अरं दुष्काळ दुष्काळ काय सांगू बाबा तुला
जो वरी हाय तोवर जपणं जीवा
माझ्या जीवाची तो न करी परवा
त्या जीवाची मला परवा
माझ्यातली माणुसकी त्याला नाही कळली
म्हणूनच कुऱ्हाड माझ्यावर घातली
अरं दुष्काळ दुष्काळ काय सांगू बाबा तुला
कशी त्या दया येईना मज कळेना
एक तरी झाड लाव हे कसे उमजेना
जतन कर एक झाड हे कसे कळेना
अरं दुष्काळ दुष्काळ काय सांगू बाबा तुला
अरं माणसा माणसा एक तरी झाड लाव