STORYMIRROR

Sunjay Dobade

Tragedy

4  

Sunjay Dobade

Tragedy

दे दान सुटे गिरान...

दे दान सुटे गिरान...

1 min
38.6K


तुला आवडणाऱ्या सुकुमार चंद्राचा मुखडा

जेव्हा काळवंडू लागला,

"दे दान सुटे गिरान" म्हणत

वेशीबाहेरून काही दरिद्री अबला आल्या.

तुला त्यांच्या दारिद्र्याची कीव आली की,

त्यांच्या मूर्खपणाचं हसू आलं?


तुझी जुनी पुराणी चिरगुटे

गरीब बिचाऱ्या बायांना दान केली

तेव्हा तुला हायसं वाटलं.

अशा दानाने ग्रहण सुटणार नाही

हे तुलाही माहीत होतं.

त्यांच्यावर दया करावी असं तर तुला कधी वाटलंच नव्हतं.

तुला त्यांची दया आली असती तर;

त्या अशा फाटक्या लक्तरात हिंडल्याच नसत्या.


तुझ्या घरची पिडा तिच्या माथी मारून

तुझी सुटका झाली असं तू समजू नकोस,

तू जोपर्यंत त्यांना माणूस मानत नाही

तोपर्यंत त्यांचं दारिद्र्य फिटणार नाही

आणि तुझं ग्रहणही...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy