STORYMIRROR

Sunjay Dobade

Tragedy

2  

Sunjay Dobade

Tragedy

अतिक्रमण

अतिक्रमण

1 min
573



धुळीचा गुलाल उधळत जाणाऱ्या मोटारींनी

बुजवल्या इथल्या पाऊलखुणा

इथे कधी उमटत होती

घामाने लडबडलेल्या मजुरांची पावले

आता दिसते स्कार्फमध्ये चेहरा झाकणाऱ्या

ललनांच्या स्पोर्टशूजवरची नक्षी


शहरांचं खेड्यावर अतिक्रमण झाल्यापासून

गोड फळे देणाऱ्या आंब्याची झाडेही

तग धरून जगताहेत कशीबशी

बांडगुळाच्या आधाराने!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy