Sunjay Dobade

Tragedy

3  

Sunjay Dobade

Tragedy

धरण

धरण

1 min
12K


रणरणतं ऊन

धगधगतं मन

काहील अंगाची

तगमग जीवाची

कोकलतंय मूल

विझलेली चूल

चारा सुकलेला

बैल भुकेलेला

शेतकरी हैराण

आयुष्य वैराण

रान तहानलेलं

गाव शिणलेलं

धरण उशाला

कोरड घशाला

जमीन आपली

धरणाने व्यापली

धरणाचं पाणी

पळवलं कोणी

पाईप मोठे

चालले कोठे?

उफराटा कायदा

शहराचा फायदा

कारखान्याची मागणी

धो धो पाणी

खेड्याची मालमत्ता

भलत्याची सत्ता

सरकारी नीती

घातक किती?

पैशावाल्याला जगवा

शेतकऱ्याला नागवा

वाजवू या बिगूल

करू या हूल

काही ना अशक्य

मिळवू या हक्क!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy