STORYMIRROR

Sourabh Powar SP

Tragedy

4.3  

Sourabh Powar SP

Tragedy

शेतकरी

शेतकरी

1 min
43.5K


माझा शेतकरी बा बी 

किसान लाॅंग मोर्चात 

सामील झाला व्हता 

त्याच्या न्याय-हक्कांसाठी लढत व्हता

बऱ्याच अंतराची पायपीट करून 

विधानसभेवर आला व्हता 

या त्याच्या लढ्याला 

बऱ्याच जणांनी पाठिंबा दावला व्हता 

डोस्क्याला ऊन लागत व्हतं

पायाला टार पोळत व्हतं

कशाची बी पर्वा न करता 

फकस्त न्यायासाठी एकत्र आल हुतं

माझा देश शेतकऱ्यांचा 

देश म्हणून वळखला जातो

पर त्याची ही बिकट अवस्था बगून

काळजाचा पार विस्कूट व्हतो

या जगाच्या पोशिंद्याला 

समदेच म्हणत्यात बळीराजा 

पर अजून पत्तर कळल न्हाई 

तरीबी का करतो आक्रोश बळीराजा...? 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy