STORYMIRROR

Sourabh Powar SP

Drama

3  

Sourabh Powar SP

Drama

बा इठ्ठला

बा इठ्ठला

1 min
15.6K


बा इठ्ठला

गेली कित्येक वर्षे

आहे तसाच आहेस उभा

तू विटेवरी

लोटली कित्येक वर्षे

बाप माझा येतो

तुझ्याच दारी

बनूनी वारकरी

तरीही त्याच्याच गळा

का रे फासाची दोरी

अजूनही आशा आहेत

तू भरशील रे तुझ्या हाताने

त्याच्या न्यायाची शिदोरी


बा इठ्ठला

आता बदललाय काळ

तुही बदललं पाहिजेस

आता नको उभारू

नुसताच त्या विटेवरी

फोडून टाक ती वीट

अन्याय करणाऱ्यांच्या माथ्यावरी

आया-बहिणींची अब्रु

लुटणाऱ्या करंट्यांवरी


बा इठ्ठला

नको ठेऊ नुसताच हात

त्या कटेवरी

ठेव हात तू त्यांच्या माथ्यावरी

अन् काढून टाक

ज्यांच्या माथ्यात

जाती-पातीचे, अज्ञानाचे,

द्वेषाचे, अविचारांचे

विष भरले आहे जहरी


बा इठ्ठला

नको उभारू नुसताच

त्या चंद्रभागेच्या तिरी

चंद्रभागेतल्या पाण्याच्या

विवेकाचा, सद्बुद्धीचा,

संतांच्या विचारांचा,

समतेचा बंधुतेचा नि

रोष्ट्रोद्धाराचा घोट दे

तू सगळ्यांच्या गळी


बा इठ्ठला

नाही मोठे मागणे

या वेड्याचे तुझ्या पदरी

तुला जमलच तर

हे सगळ करून बघ

बा इठ्ठला एकदा तरी....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama