Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Neha Ranalkar

Drama


5.0  

Neha Ranalkar

Drama


कुसुमाग्रज ( वि. वा. शिरवाडकर)

कुसुमाग्रज ( वि. वा. शिरवाडकर)

1 min 588 1 min 588

कुसुमाग्रजांच्या साहित्याला 'प्रतिसाद' देत|


सुरक्षित झाली 'माय मराठी' 'छंदोमयी' होत|


मानवला तिला ,'राजमुकुट'झाली 

'जीवन लहरी'|


ग्रहमानाने गेली 'अंतराळ', 'मुक्तायन' गात| 


जवळुन पाहण्यास 'दूरचे दिवे'

झाली 'चांदणवेल'|


'विशाखा' वाचून ती 'वीज म्हणाली धरतीला'|


वाटले तिला घ्यावा शोध 'शेक्सपिअरचा' 'मकबेथ' होऊन|


शिव ओलांडून भाषेची 'आथेल्लो' ची 'अपाईंटमेंट' घेतली|


'रसयात्रा'नटसम्राटाची करुन 'स्वगत' म्हणून 'रुपरेषा केली|


'वादळवेल' कोठे म्हणत 'पिंपळपान' होऊन 'किनारा' शोधे 'मेघदूत' होऊन|


डगमगली नाही 'ती फुलराणी'

'काव्य वाहिनी' 'वैजयंती' व 'जान्हवी'|


'कल्पनेच्या तीरावर' तिला भेटले 'ययाती देवयानी' अन् 'वैष्णव'|


रम्य 'प्रवासी पक्षी' होऊन ऐकले 'सतारीचे बोल' 'हिमरेषा ' एकमेव|


Rate this content
Log in

More marathi poem from Neha Ranalkar

Similar marathi poem from Drama