Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Inspirational

3  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Inspirational

विषय:- श्रावणसरी

विषय:- श्रावणसरी

1 min
166


श्रावणमास आहेच अगदी खास

बरसतात अचानक श्रावण सरी |

दिवस सण उत्सवांचे सृष्टीसवे 

येई आनंदाचे उधाण प्रत्येक घरी | |


लेकी येती माहेराला साजरी

करण्या मंगळागौर श्रावणात |

घर पंचपक्वानांनी भरले सुगंध

दरवळे जागरण खेळ परसात | |


वारुळास नाग पुजेस जाती घेऊन 

नैवेद्याला लाह्या फुटाणे नि दूध |

नरसिंह अवतार भगवान विष्णूंचा 

ग्रहही पुजतात बृहस्पती नि बुध | |


शुक्रवारी असे जरा जिवंतिका

पूजा मुलांच्या दीर्घायुष्यासाठी |

शनिवारी अश्वत्थ मारुतीची पूजा

भावांचे आयुष्य वाढवण्यासाठी | |


नारळी पौर्णिमा सण येतो कोळी

बांधवांचा सागरा नारळ अर्पण |

भावा बहिणींच्या स्नेहाचे प्रतीक

सण रक्षाबंधन नात्यांसाठी दर्पण | |


दर सोमवारी महादेवाचा अभिषेक

पूजा दर्शनासाठी रांगा मंदिरात |

कृष्ण अष्टमीला श्रीकृष्ण जयंती

रात्री बारास साजरी होईआनंदात | |


गोपाळकाला नवमीला संतज्ञानेश्वर

माऊलींच्या जयंतीचा उत्सव भारी |

श्रावणी पिठोरी अमावस्येला येती

पोळ्याचे बैल सजूनधजून दारी | |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract