Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Fantasy Inspirational

3  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Fantasy Inspirational

आठवडी बाजार

आठवडी बाजार

1 min
213


आठवड्यातून एकदा नेहमीच 

भरत असतो आठवडी बाजार |

काही ना काही कारण काढून 

खरेदी करण्याचा जडे आजार | |१| |


किराणा, घर सामान, भांडीकुंडी

कपलत्ते सा-या़ची असे रेलचेल |

अर्थाचे नियोजन महिन्याचे पण

होते या बाजारात पूर्णत: फेल | |२| |


खिशातली चाराणी आठाणी नाणी

गेलीत रुपयांनी तरी नाही भागतं |

शेंगदाणे फुटाणे शिरणी घेता इतर

खाऊसाठी मनच मारावं लागतं | |३| |


आठवडी बाजारात जाण्यासाठी

सारीच उत्सुक तरणी म्हातारी |

फिरणं,खरेदी,हौस,मौज नि मस्ती

वाटे तरीही नफ्याचीच खातरी | |४| |


आबालवृद्धांना लावी वेड हा आठवडी

बाजार वेळ व खर्च करी अनाठायी |

कधी अनुभव त्रासदायी फसवे तर कधी 

सारेच हास्यास्पद तरी जिवनदायी | |५| |


आठवड्यातून एकदा गावी वा शहरी नेहमीच

भरणारा हा आठवडी बाजार आबालवृद्धांना कसा वेड लावतो व वेळे बरोबर अनाठायी खर्च तर कधी जिवनदायी अनुभव देऊन जातो याचेच वर्णन या कवितेत केले आहे.  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract