STORYMIRROR

Deepali Thete-Rao

Abstract

3  

Deepali Thete-Rao

Abstract

पाळणाघर

पाळणाघर

1 min
388

जाऊ नको थांब ना

दोन इवल्या हातांनी मिठी मारली

डोळ्यांत साचले दाट धुके

वाट माझी पावलात अडखळली

सोडून जाता तुला

मुके शब्द सारे होती

वेदना अंतरातल्या मम

नेत्रांतून हलकेच पाझरती

मनात वेडी आशा

पाऊल ओलांडे उंबरा

कष्टप्रद वाट ही खरी परी

करील तव भविष्याकाल साजिरा

तुला सोडताना पाळणाघरात,

माझी व्यथा डोळ्यांतून सांडली

मम मनाची करूण यातना

का असेल तुला आकळली....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract