STORYMIRROR

Deepali Thete-Rao

Classics

3  

Deepali Thete-Rao

Classics

पाऊस

पाऊस

1 min
324

आषाढ पाहुणा पाउस

आगंतुक असा डोकावला

तव आठवणींचा वारा

त्याच्यासवे सुसाटला


या पावसाचे वेड तुजला

मी अशी जराशी अलिप्त

भेटविलेस मेघांशी नव्याने

तुझ्यासवे भिजताना मी तृप्त तृप्त..


तुझा माझा पाऊस....

अवचित दारी ठाकला

कसे सांगू तुझ्याविना

मी एकट्याने अनुभवला


अंतरात झिरपती जलधारा

चिंब चिंब मन झाले

मळभ तव आठवांचे...

अवेळी दाटून आले


 वाद्यवृंद घनगर्जनांचे

पाऊले थिरकीती चपला

आषाढ मेघ हा बरसे

निसर्ग त्याते रमला


 धरा ओलेती प्रेमाने

आसमंत अवघा न्हालेला

माझिया मनी विरह हुरहुर 

दूर तिकडे..का तू ही ओलावलेला ?


गंध तुझ्या कायेचा

हा वारा वहात आणतो

श्वासांतून उरात भरता

पुलकित देह मम होतो


अमृतधारांनी कुरवाळीत 

पाऊस हलकेच छेडतो

तुझ्या प्रेमाने ओथंबून

शहारा अंगावरी फुलतो


जाणते पावसाचा कावा

मज चिंब असं भिजवायचं

डोळ्यांतून ओसंडूनी मग

तन मन रितं रितं करायचं


मी माझ्यात कुठे मग उरले

मनमेघ बेफाम बरसला

तुझ्या आठवांचा बहर सारा

हा क्षण क्षण वाहून गेला....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics