STORYMIRROR

Deepali Thete-Rao

Romance

3  

Deepali Thete-Rao

Romance

गंध तुझ्या कायेचा..​.

गंध तुझ्या कायेचा..​.

1 min
169

मृद्गंधित पाहुणा पाउस

आगंतुक असा डोकावला

तव आठवणींचा वारा

त्याच्यासवे बघ कसा सुसाटला


या पावसाचे वेड तुजला

मी अशी जराशी अलिप्त

भेटविलेस मेघांशी नव्याने

तुझ्यासवे भिजताना मी तृप्त तृप्त..


तुझा माझा पाऊस....

अवचित दारी ठाकला

कसे सांगू तुझ्याविना

मी एकट्याने अनुभवला


अंतरात झिरपती जलधारा

चिंब चिंब मन झाले

मळभ तव आठवांचे...

अवेळी दाटून आले


 वाद्यवृंद घनगर्जनांचे

पाऊले थिरकीती चपला

आषाढ मेघ हा बरसे

निसर्ग त्याते रमला


 धरा ओलेती प्रेमाने

आसमंत अवघा न्हालेला

माझिया मनी विरह हुरहुर 

दूर तिकडे..का तू ही असे ओलावलेला ?


हा गंध तुझ्या कायेचा

 वारा वहात आणतो

श्वासांतून उरात भरता

पुलकित देह मम होतो


अमृतधारांनी कुरवाळीत 

पाऊस हलकेच छेडतो

तुझ्या प्रेमाने ओथंबून

शहारा अंगावरी फुलतो


जाणते पावसाचा कावा

मज चिंब चिंब भिजवायचं

डोळ्यांतून ओसंडूनी मग

तन मन रितं रितं करायचं


मी माझ्यात कुठे मग उरले

मनमेघ बेफाम बरसला

तुझ्या आठवांचा बहर सारा

पावसाने क्षण क्षण वाहून नेला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance