Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Deepali Thete-Rao

Abstract Inspirational

3.4  

Deepali Thete-Rao

Abstract Inspirational

ती....

ती....

1 min
256


जन्म झाला तेव्हा सगळे म्हणाले 

अरे ! बेटी धन की पेटी है। 

मला हृदयाशी कवटाळून,

माझ्या छोट्या नाजूक हाताला, 

हातात धरून म्हणाले...

तूच आता सारा आनंद उधळत रहा घरभर..

आणून एक छोटासा भाऊ 

तुझ्या पाठीवर......

तेव्हा जाणीव नाही झाली... 

 लोक प्रेम करत राहिले माझ्यावर

 आणि...

आणि नकळत अजाण अपेक्षांचं ओझं, 

चढवत राहिले डोक्यावर...

मोठी होत गेले, 

आई-वडिलांचा हात धरून, 

स्वतंत्र होते मी...त्यांच्या मते 

कुठेही खेळण्यासाठी अन् जाण्यासाठी, मलाच होती निवडायची जागा

 माझ्या विहरण्यासाठी...

त्यांनी आधीच ठरवून ठेवलेल्या जागेतील एक..... 

 अभ्यासात हुशार होते म्हणून, 

प्रोत्साहन दिलं गेलं, 

जे बनायचे ते बन म्हणाले,

डॉक्टर, इंजिनिअर... 

आमचं नाव मोठं कर

म्हणजे..

म्हणजे,लग्नासाठी चांगला मुलगा मिळेल.. 

मला व्हायचे होते जे मला आवडेल, 

 मुक्त फुलपाखरू बनून होते जगायचे, 

नदी बनून स्वच्छंद, खळखळून वहायचे, 

पण अपेक्षांचे भोवरे येतच राहीले वाटेत.....

सगळे सांगत गेले 

मी ऐकत गेले 

हे घाल ते कर इकडे जाऊ नको 

ते सांगत गेले..

मी चालत गेले...

नव्याने मांडलेल्या खेळातही.. 


 एक दिवस जेव्हा धरला हात

 माझ्या छोट्याशा फुला ने माझा

 तेव्हा खूप आतून जाणीव झाली

 अरे मी स्वतंत्र झाले....

माझ्या छोट्याश्या परीसाठी

 मी दिवस-रात्र झटले 

तिला सांगत राहीले चूक बरोबर 

पण ....

अचानक जाणवलं काहीतरी

 पूर्ण हलले मी आतून बाहेरून कळकळून

 हे तर तेच होत होतं 

 जे बर्‍याच वर्षांपूर्वी घडलं होतं 

मीही माझ्या लेकीला 

वारसाहक्काने देउ पहात होते 

चौकटीतलं स्वातंत्र्य........ 

आताशा ठरवते आहे..

खरंच मुक्त होऊ द्यावं

 सरळ बेधडक धडकू द्यावं तिला

 वेगवेगळ्या आव्हानांना..

घेऊ द्यावा अनुभव चांगल्या-वाईटाचा

मला फक्त या मातीत.. 

 पेरायची आहेत संस्कारांची बीजं.. 

द्यायची आहे संकटाशी लढण्याची क्षमता.. 

मानसिक आणि वैचारिक स्वातंत्र्य.. 

आणि हो.. 

पडलीच कधी चालताना कुठे तर तिला झेलण्यासाठीची ओंजळ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract