चल निघू या
चल निघू या
चल निघू या
अनिश्चित अस्वस्थ वाटेने
मार्गक्रमण करत
एका अनिश्चित स्थळी पोहचू या
विषमतेच्या दुखऱ्या जखमा
भरून काढू या
अस्थिर समुद्रापरी पुन्हा
प्रयाण करू या
या तेजस्वी निसर्गात
निमग्न होऊ या
चल निघू या
लीन ते मलिन झालेल्या
चारित्र्याच्या माणसांच्या शिवारात
चल निघू या
दारिद्रयापोटी जन्मलेल्या माणसांकडे
अन्नासाठी जळणाऱ्या भटक्यांकडे
देह सजवणाऱ्या आणि झिजवणाऱ्या अबलांकडे
चल निघू या
संपत्तीच्या भुकेल्या प्रतिनिधींकडे
भिकारड्या वासनेच्या अंतःप्रवाहाकडे
आणि मग,
त्याही पलीकडे...
चल निघू या
अनिश्चित अस्वस्थ वाटेने
मार्गक्रमण करत
एका अनिश्चित स्थळी पोहचू या.....