अफवा
अफवा
पेरले अफवेचे बीज, की ते लगेच अंकुरते
नंतर अंकुरलेले बीज, उत्तम तगही धरते
अफवा वृक्ष कार्यक्षम, खूप निर्मिती अफवांची
दरेक अफवा ज्वाला असते, समाज-विरोधी कार्याची!
विविध अफवा जिकडे तिकडे, वायुवेगे पसरत जाती
जेते अपुल्या सोयीनुसार, त्यांचे अर्थ लावत असती
अफवा असते अफूसमान, ऐकणारा भान विसरतो!
ऐकलेल्या अफवांना तो, रोचक बनवून पसरवतो!!
अफवाची प्रक्रिया अजब, स्वयंचलित असते !
केवळ काही मिनिटांमध्ये, अफवांचे जाळे होते!!
p>ह्या जाळ्यातच अडकून पडती, माणसे निर्दोष!
सुटकेसाठी धडपड करती, 'वाचवा...' आक्रोश!!
मग सरकारी यंत्रणा, वाचवण्याचा प्रयत्न करते!
परंतु माथेफिरू प्रजेला, तेच बघा नको असते!!
दृष्ट प्रजेचे दुष्कर्म, करती अचूक दंगल सुरु !
राक्षसी आनंदासाठी, ते म्हणती 'काहीही करू '!!
लुटालूट अन आग लावणे, संगे खुनाखुनी !
तरीच बीज अफवांचे, पेरू नये हो कोणी !!
अफवा कानावर पडली की, उत्तेजना नसावी !
जे उत्तेजित झाले त्यांना, 'शांत राहा' शिकवण द्यवी !!