STORYMIRROR

Sarika Musale

Abstract Others

4  

Sarika Musale

Abstract Others

निसर्ग

निसर्ग

1 min
312

रम्य सकाळी

दिनकर गगणी

उजळे धरणी


लाल केशरी

मारा तो किरणांचा

थाट रवीचा


नाद घंटेचा

निनादतो मंदिरी

ईश अंतरी


पडे सर्वत्र 

सडा दवबिंदूंचा 

साज धरेचा


अल्लड वारा

पान-फुलांचा झुला

झोंबे अंगाला


अंगणी माझ्या 

मोहरला मोगरा

गंधित धरा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract