पळस फुले
पळस फुले
1 min
508
मनोवेधक
पळस बहरले
मन हर्षले
केशरी फुले
भासे ज्वाला अग्नीच्या
तप्त उन्हाच्या
लाल तांबडी
जशी चोच राघूची
पाकळी त्याची
मधू सुमने
भुंगे मध चाखील
हर्ष होईल
पूजा करुया
सरस्वती चरणी
फुले वाहूनी
औषधी गुण
वैद्यराज शोभतो
रोग हरतो
