ओढ पावसाची
ओढ पावसाची


भेगाळलेली ही धरा
वाट तुझी पाहते रे
तहानेने व्याकूळ धरेला
ओढ पावसाची लागली रे
पशू-पक्ष्यांची पाण्याविना
नजर नभी भिरभिरते रे
थाःबवण्या वणवण मानवाचीही
ओढ पावसाची लागली रे
नद्या-ओढीही आटली सारे
उन्हाने लाही-लाही रे
चिंब चिंब होऊनी खेळायला
ओढ पावसाची लागली रे
कोकीळ देई साद तुला
मोरालाही आस लागली रे
मृत्तिकेच्या गंधात गंधाळण्या
ओढ पावसाची लागली रे
अलंकार दवबिंदूंचा लेऊनी
वसुंधरेला आता श्रृंगारायचे रे
हिरवा शालू नेसण्यापरी
ओढ पावसाची लागली रे