STORYMIRROR

Sarika Musale

Classics

3  

Sarika Musale

Classics

रक्षाबंधन

रक्षाबंधन

1 min
157


सण हा किती आनंदाचा

भाऊ-बहिणीच्या जिव्हाळ्याचा

नाही हा बंध रेशमाचा

आहे हा बंध प्रेमाचा


बालपणीच्या त्या आठवणींचा

विसर रे नाही पडला

किती भांडलो आपण तरी

तुझ्यावाचून करमेना


कृष्णापरि तू राहा पाठीराखा

विसरु नको कधी मजला

औक्षवंत हो भाऊराया

माझं औक्ष मिळो तुला


राखी बांधण्यासाठी रे तुला

बहिणीची वाढे आतुरता

आठवण तुझी येता क्षणी

नयनी अश्रू ओघळला


बांधते हा धागा विश्वासाचा 

वचन देऊ आपण एकमेकांना 

नात्यातील सुगंध नित्य दरवळावा

ईश्वरचरणी हीच कामना


Rate this content
Log in