नटखट रे मुरलीधरा
नटखट रे मुरलीधरा


साद ऐकुनी तुझ्या बासरीची
बेधुंद झाली राधा बावरी
नटखट रे मुरलीधरा
तूच वसतोस अंतरी
तूच माझा कृष्णसावळा
अधुरीच राधा तुझ्याविना
प्रेम आगळेच तुझे-माझे
छबी तुझी माझिया नयना
रुप सावळे भाळले किती
त्यात मोरपीस शोभे भाळी
संगे बासरीचे स्वर मनोहारी
गोपिकांचा मेळा भोवताली
कृष्ण-कृष्ण मुखी रात्रंदिनी
कृष्णप्रेमात राधा न्हाली
जोडी अशी राधा-कृष्णाची
दोघे एकरुप जाहली
पाहूनी प्रतिबिंब जलातही
सावळ्याचीच दिसे छबी
तन जरी असे अलग तयांचे
तरी एकाच अंतरी वसती