भाव माझ्या अंतरीचे
भाव माझ्या अंतरीचे


जाणून का तू घेत नाहीस
भाव माझ्या अंतरीचे
हृदयात आहेस तूच सख्या
ऐक साद स्पंदनाचे
रेंगाळती क्षण सारे
सदाच तुझ्याभोवती
तूच माझा प्राण रे
जीव जडला तुझ्यावरती
नाते हे सातजन्माचे
साथ सदा देशील ना
तुझ्या नजरेतील माझे
स्थान असेच राहिल ना
पैंजनाचा नाद सख्या
तुलाच बोलावत आहे
गंध हा मोग-याचा
मनाला मोहावत आहे
इंद्रधनुच्या रंगांसम
संसार आपला रंगला
भाव तो माझ्या अंतरीचा
सख्या तुला कळला