आम्ही सावित्रीच्या लेकी
आम्ही सावित्रीच्या लेकी
आकाशाला घालू गवसणी
प्रखर गुणांची उधळण करुनी
आसमंत सारा टाकू उजळूनी
आहोत आम्ही सावित्रीच्या लेकी
प्रतिमा ठेवू विश्व चमकवणारी
करू विक्रम वादळापरी
वाहू शिक्षणाची गंगा घरोघरी
आम्ही सावित्रीच्या लेकी
अज्ञानाचा अंधःकार दूर करु आम्ही
ज्ञानाचा दिवा उजळवू विश्वामधी
घेऊ नभी उंच भरारी
आम्ही सावित्रीच्या लेकी
साक्षर भारत घडवू आम्ही
प्रगती घडवू दोन्ही घरी
फुलवू नंदनवन अंगणी
आम्ही सावित्रीच्या लेकी
कास धरु नव तंत्रज्ञानाची
उंचवू मान देशाची
अगाध राखू स्त्री शक्तीचा महिमा जगी
आम्ही सावित्रीच्या लेकी
आम्ही सावित्रीच्या लेकी.
