STORYMIRROR

Sarika Musale

Inspirational

3  

Sarika Musale

Inspirational

स्त्रीशक्ती - घे तू उंच भरारी

स्त्रीशक्ती - घे तू उंच भरारी

1 min
370

घे तू उंच भरारी 

पाश बंधनाचे तोडूनी 

मुक्त विहर तू स्वच्छंदी 

पाहू नको मागे फिरुनी

 यशाच्या शिखरी घे उंच भरारी 

जखडू नको तू जग हे जुल्मी 

नको भय एकाकी पथावरी 

अन्याय तो रोखण्या दुर्गा अवतरली

 तोडण्या दृष्टप्रवृत्ती घे तू उंच भरारी 

आज बायका-लेकींची अब्रू वेशीवरी 

नराधम फिरती मान उंच करुनी 

वेळीच त्यांचा बंदोबस्त करण्या

घे तलवार हाती जिजाऊंना स्मरुनी 

हुंड्यापरी आजही जाई हुंडाबळी 

स्त्री-भ्रूणहत्या होई आजच्या युगी 

रोखण्या बळी हो तू रणरागिणी 

अस्तित्व टिकावया घे तू उंच भरारी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational