शुर सरदार
शुर सरदार
छत्रपती शिवाजी महाराज जन्मले
दूर करण्याकरिता जनतेचा अत्याचार
केले स्थापन हिंदवी स्वराज्य त्यांनी
झाले पराक्रमी तेजस्वी ते शुरसरदार......
सत्य शिवरायाने दिली संस्कृती
अनुपम असा सूर्य आला भूतलावरी
भेटला स्वराज्याला मार्गदर्शक अप्रतिम
शौर्य भरूनी केली अद्भूत कामगीरी........
शिवराया हा दुष्टांचा कर्दनकाळ
शत्रूमर्दनास शिवाने उचलली तलवार
जिजाऊचा तो लहानगा बाळगोपाळ
झालाया जगी तो महाराजा कर्तबगार..........
दुष्टांचा संहार हा करूनी दुष्मनांचा
शिवाजीने फडशा पाडला आरपार
हिंदवी स्वराज्य स्थापन करूनीया
महापराक्रमी राजा झाला भूषणकार..
.........
शिवरायाने दिली खरी संस्कृती
अद्वितीय अनुपम अशी या भूवरी
असा भेटला राज्याला मार्गदर्शक
लढला तो शौर्याने समरांगनावरी...........
अफझलखानाची आतडी फाडूनी
शाहिस्ता खानाची करून बोटे सादर
रयतेसाठी असाधारण हा प्रयोग
केला शिवाजींनी असा महा चमत्कार........
औरंगजेबाला अस्सल धडा शिकविला
मावळ्यांना घेऊनी केले वारावर वार
गनिमी कावा चक्रव्युहाची रचना करून
झाला शौर्यवान जनतेचा तारणहार............
परस्त्रीयांना दिले शिवाजीने आदर सन्मान
गोरगरीब जनतेस सदैव दिला आधार
रूजूनी बसला मन्मनी या भारतियात
नतमस्तक होवून देवूया मनस्वी आदर...