STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational Others

4  

Abasaheb Mhaske

Inspirational Others

अंगणी मज आली

अंगणी मज आली

1 min
27.3K


इवलीशी चिमणी अंगणी माझ्या आली

रमली  - दमली घरट्यात विसावली 

हसली - खिदळली कधी कडकडून भांडली 

धाय मोकलून रडली तर कधी प्रेमात न्हाली 

इवलीशी चिमणी अंगणी माझ्या आली

कधी झाली माझी आई , कधी बाळाची हो ताई 

कुटुंबाचा आधार कधी झाली बाळासाठी अंगाई 

मायेची माउली तर कधी सांजची सावली

इवलीशी चिमणी अंगणी माझ्या आली

घरटं माझं सावरताना कर्तव्यकठोर बाप झाली

प्रेमाची भुकेली, पण प्रेमचं वाटून गेली

वात बनुनी जळत राहिली दिव्यापरी तेजाळली

इवलीशी चिमणी अंगणी माझ्या आली

अंगणी रमता - रमता घरभर दरळली

तीन बुक न शिकताही बहिणाबाई झाली 

आधार शोधायला आली अन माझाच आधार झाली 

इवलीशी चिमणी अंगणी माझ्या आली

एके दिवशी अचानक भुर्रकन उडून गेली 

गेली परंतु जगण्यास माझ्या उभारी देऊन गेली 

चंदनापरी झिजली पण पंखास माझ्या बळ देऊन गेली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational