आखिल भारतीय साहित्य संमेलन कवि
आखिल भारतीय साहित्य संमेलन कवि
ते शुभ्र चांदणे मी एकटीच पहात होते
आठवून आठवणी त्या मन सैरभैर होते
प्रकाशात चांदण्यांच्या उलगडतात अनेक सत्य
मी का अनेक सत्य झाकून ठेवत होते
तुटतो मधेच तारा परी दुःख ना चांदण्यांना
मी का अनेक दुःख कुरवाळत चालले होते
सावरून त्या ढगांना चांदणे मधेच चमकत होते
मी अशाच सुखाच्या किरणच्या शोधात होते
भला गुण चांदण्यांचा लुकलुकने पर प्रकाशी
मी स्वयं प्रकाश ही माझा विसरून चालले होते
पहाटेला चांदण्या त्या उद्याची वाट पहात होत्या
उज्ज्वल भविष्य मुलांचे माझ्या ही डोळयात होते
शिकले चांदण्याकडून त्या जगणे सावरून दुःख
जगण्यास ध्येय अनेक हे का मी विसरत होते