Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others


2.1  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others


सावित्रीबाई फुले- पोवाड़ा

सावित्रीबाई फुले- पोवाड़ा

1 min 20.8K 1 min 20.8K

सावित्रीबाई फुले

प्रथम वंदन सावित्रीबाईला। भारत कन्येला।शिक्षणमाईला।

अंधार मय युगात। अवघ्या महाराष्ट्रात। स्री शिक्षणाला नव्हती हिम्मत ।नियतीने केली मात। जी जी जी

ज्ञानरूपी दिवा प्रकाशला।सातारा जिल्ह्याला।पवित्र स्थानाला ।

मायभूमीत जन्म झाला।भाग्य लाभले महाराष्ट्राला। धरतीला आनंद झाला।अभिमान भारत देशाला। जी जी जी

जोतिबाशी विवाह झाला।साथ मिळाली सावित्रीबाईला।

शिक्षण कार्याला।

सत्यशोधक समाज कार्याला।मानव कल्याणाला।घातक रूढ़ी फेकन्याला।चळवळ स्री शिक्षणाला।जी जी जी

जीवाचे करुन रान।छळले समाज कर्मटाने।दगड, शेणाचा मार झेलून।

जोतिबाचा बाणा कणखर।सावित्रीबाईला मिळाला आधार।डगमगले नाही कणभर।समाज कार्य भारतभर।जी जी जी

मुलींना मिळाला मान।शिकू लागले बहुजन।कर्मटांच्या सुटल्या जाचातून।

संघर्षातून मिळाले शिक्षण।शिक्षणाचे खुले दालन।स्रीयाना आदराचे स्थान।सावित्री बाईंचे योगदान।जी जी जी

क्रांती झाली पुणे शहरात।भिडेेवाडयात।मुलींच्या भविष्यात।मानवासाठी वाहिले जीवन।पिढ्या पिढ्यांचे केले कल्याण।सर्वधर्माची समान शिकवण।हक्क जगण्या दिला मिळवून।जी जी जी

पहिला बहुमान स्री शिक्षिकेला।क्रांती ज्योतिला,ज्ञान ज्योतिला।शिक्षण मातेला।

अजरामर झाल्या इतिहासात। नोंद सोनेरी अक्षरात।पहिल्या मुलींच्या शाळेत।शिक्षण दिन साजरा करण्यात। जी जी जी


Rate this content
Log in

More marathi poem from Sanjay Raghunath Sonawane

Similar marathi poem from Inspirational