STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Others

माझी झोपडी

माझी झोपडी

1 min
912

माझी गरीबाची झोपडी 

माझी रे गरीबाची गोधडी 

सुख देते महालाहुनी भारी 

झोप लागे छान सुखापरी 

नाही चिंता धनदौलतीची 

नको हाव मनी श्रीमंतीची 

माझी गरीबाची झोपडी 

माझी रे गरीबाची गोधडी  


समाधान लाभे आमुच्या पदरी 

कष्टाने उदर भरतो आम्ही भारी 

नको दुनियेची आम्हाला कटकट 

नको फुकटची श्रीमंती झटपट 

भाकर बरी आम्हाला कष्टाची 

चिंता नको आम्हाला दुनियेची 

माझी गरीबाची झोपडी 

माझी रे गरीबाची गोधडी  


नको रे कर्जापायी खोटी प्रतिष्ठा 

खरे जीवन जगण्याची आमची निष्ठा 

साधेपणाने मिळते खरे सुख 

मिळतो आनंद पळते दुःख 

नको चोचले फुकट इंद्रियाचे 

नको व्यसन गरीबांस विकतचे 

माझी गरीबाची झोपडी 

माझी रे गरीबाची गोधडी  


जाऊ नको रे तू वाया 

कष्टाने झिजव तुझी काया 

हिंमत येईल तुमच्या अंगात 

स्वाभिमान वाढेल तुमच्या रक्तात 

ताठ मानेने जगात जगशील 

आनंद जीवनाचा तू घेशील 

माझी गरीबाची झोपडी 

माझी गरीबाची गोधडी


Rate this content
Log in