STORYMIRROR

Pradnya deshpande

Inspirational

5  

Pradnya deshpande

Inspirational

आस वात्सल्यभेटीची

आस वात्सल्यभेटीची

1 min
1.3K

दारात उभी मी,

तुझी वाट पाहे,

तुझ्या भेटीची,

जीवा आस लागे,


चिऊ -काऊ चा घास,

भरविला तुला,

मोठा कधी झालास,

कळलेच नाही मला,


 पैसा ,गाडी, बंगला,

सर्व तुझे आहे,

काय उणे तुला,

दिले काळीजही माझे 


त्सुनामी ममतेची,

उसळून येते,

सगळीकडे तुझे मला,

प्रतिबिंब भासे,


रोमरोमात माझ्या,

 तूच आहेस,

सांग ना रे बाळाा,

कधी येशील,


शेवटचे श्वास माझे,

तुझ्यासाठी आहेत,

धीर आता धरवत नाही, 

प्राण कंठाशी आलेत,


एकदाच तुला कुशीत घेईन,

भरूनी डोळे मी पाहीन,

वात्सल्य भेटीत,

वैकुंठ गाठेन.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational