STORYMIRROR

Pradnya deshpande

Inspirational

3  

Pradnya deshpande

Inspirational

भारत महान

भारत महान

1 min
213

भारतीय आम्ही 

 राखू देशमान

कायद्याची सूत्रे

घटना महान


न्याय देेवू आम्ही

तोलू सत्य माप

गुन्ह्या देेऊ शिक्षा

करू नाही माफ


 सिंहासन शोभे

भल्या राजास ते

 दिले शिवबाने

 मार्ग चालण्याचे


संस्कृती आपुली

सर्वश्रेष्ठ असे

सर्व जाती धर्म

 एक पंथ दिसे


पावलागणिक 

जवान आठवे

त्यांच्यासाठीच मी

 सलाम ठोकते


ध्वज फडकवू  

 गाऊ देश गान 

प्रिय आमचा हो

भारत महान  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational