STORYMIRROR

Pradnya deshpande

Inspirational

4  

Pradnya deshpande

Inspirational

मातृभाषा

मातृभाषा

1 min
503

मायबोली माझी

 मराठी माऊली

उच्चारता बोल

 अमृत शिंपडी


गर्भात मातेच्या

 ओळखा पहिली

 बोबड्या बोलाची

बाळहाक आई


मायेच्या शब्दात

 अंगाई ऐकली

 या तान्ह्या जीवाची

भाषा पहिली


इवल्याा हातांनी

 गिरवी अक्षर

ओठातले बोल

लेखणी साक्षर 


समृद्ध होतील

मन आणि कर

भाषेत व्यक्तते

सृजनांचे स्वर


अभिमान माझ्या

मातृभाषेचा हो

ऋणात राहिन

सदैव तिच्या हो 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational