पुस्तक
पुस्तक
निपचित पडले टेबलावर
स्वतःशीच बोलत....
कुठे गेला सखा माझा
कशात गेला हरवत
रोज मला घेऊन
छातीशि कवटाळणारा
जशी लहर असेल तसाच भेटणारा
कधी दुःखी कधी कष्टी
तर कधी खूप खूप हसणारा
माझ्या हाकेला साद देत म्हणाला
गेलो होतो .......
खूप लांब... उंच टेकडीवर
शोधत होतो माझ्या प्रश्नाचे उत्तर
निराशेच्या अंधारात तोल जातच होता
तेवढ्यात आठवले.......
तुला!!!!
लहानपणापासून
जे माझ्यात रुजवत आलायस
सद्विचारांचे बीज.....
जे मला सतत जागे ठेवतात
अंजन बनून !!
आता मी ठरवलंय
जगात तुझ्या हरवायचं
कधी निराश नाही व्हायचं
एक दिवस असाही येईल
तुझ्यातूनच मी ओळखला येईन
