STORYMIRROR

Pradnya deshpande

Inspirational

3  

Pradnya deshpande

Inspirational

शेवटच्या श्वासापरी

शेवटच्या श्वासापरी

1 min
196

हृदयातला कुणीतरी

चोरून श्वास घेतला 

 कळलेच नाही कधी

 माझा 'मी' स्वाधीन केला


मन पटलावरी तू

अधिराज्य केले जेव्हा

 गोड बासरी बोलाने

 मंत्रमुग्ध केले तेव्हा


 पहिल्या प्रेमाची साक्ष

राधेस पाहून होते 

वेड्या मनास तेव्हा

तुझीच प्रतिमा दिसे


अजरामर प्रेम ते

राधामोहन पुराणी

राहूूू असेच आपण

शेवटच्या श्वासापरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational