रंग विरहाचा
रंग विरहाचा
भेटलीस जेव्हा तू मी गुलाबी झालो होतो
तू सोडून गेल्यावर विरहात काळा झालो
खुलुन आली होती मैत्री आपली तेव्हा
रंगात पिवळ्या आपण नाहले दोघे होतो
राग तुला येता फुगुन भोपळा व्हायची
बघून राग रंग मी शांत पांढरा होतो
आवडता रंग माझा लाल होता तेव्ह
तुझा निळा म्हणून मी शामरंग झालो होतो
ते दिवस हिरवाईचे फळाफुलास आले
केशरी रंगात उद्याचे स्वप्न पाहिले होते
तुझ्या साथीने मी सप्तरंग उधळले होते
तू मात्र पांढऱ्या रंगात लपेटून घेतले