ती मावळती सांज
ती मावळती सांज
हवाहवासा वाटणारा पाऊस
जेव्हा कोसळू लागतो
होत्याचे नव्हते करून
बेभान बरसतो
अशाच धारा बरसल्या
आयुष्यात तुझ्या
भूतकाळात राहिल्या
त्या पाऊलखुणा
तुझे अचानक जाणे
मनास न पटणारे
तुझ्या आठवणीत
मन चिंब भिजणारे
सहवास हवाहवासा
वाटतो आम्हाला
मैत्रीच्या माळेतला
तू शीतल चांदवा
सुना सुना आहे
तुझ्याविन कट्टा
भेटल्यावरही होतील
तुझ्याच गप्पा
मैत्रीच्या हिरवाईची
तू चैतन्य सकाळ
स्नेह बिया पेरल्या
पसरे परिमल
सणसमारंभ साजरा
कसा होईल सांग?
फेर धरता आठवेल
ती मावळती सांजा
