STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

माहिती नाही

माहिती नाही

1 min
204

जुगार काय गरीबास माहिती नाही 

उन्हात काम कुबेरास माहिती नाही 


प्रवास आज कुठे बरे चालला त्यांचा

ठिकाण काय प्रवाशास माहिती नाही


उन्हात वाढत जातो इथे कसा काटा

फुलास खडतर वनवास माहिती नाही 


कधी मिळेल मला पावसा तुझे पाणी

लहान वावर मेघास माहिती नाही


तळ्यात पंकज जपतो तुझ्याच आठवणी 

नितांत प्रेम मिलिंदास माहिती नाही 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy