साजणी
साजणी
साजणी
पावसाच्या या सरी झेलायला ये, साजणी,
एकटे वाटे मला, भेटायला ये, साजणी.
आसवांचे पूर गेले मोठमोठाले किती?
आटलेली ती नदी शोधायला ये, साजणी.
खेळ सारे तू रडीचे खेळली होतीस ना?
हारतो ग मी पुन्हा जिंकायला ये, साजणी.
नाटकामध्ये हरवला चेहरा माझा खरा,
कोण होतो मी, मला सांगायला ये, साजणी.
तू तिथे अन् मी इथे, का हात माझा सोडला?
गीत विरहाचे तरी तू गायला ये, साजणी.
- पंकज कुमार ठोंबरे
फोन: 9503717255

