STORYMIRROR

Akash asha Nitinchandra

Romance

3  

Akash asha Nitinchandra

Romance

धागे हे रेशमाचे

धागे हे रेशमाचे

1 min
251

धागे हे रेशमाचे कसे ते गुंतलेले

वसंत तो बहरला अन् मेघ दाटलेले


नाजूक तू परी अन् मीही तुझा दिवाना

किंकिन काकणांची तुझा असा तराणा

शब्दांच्या या सरी अन् ओथम्बल्या तुजपाशी

कळपात दिवान्यांच्या मी एकटा शहाना


मज आस लागलेली नाजूक त्या क्षणांची

तू साद द्यावी मजला हे वेध लागलेले


धागे हे रेशमाचे कसे ते गुंतलेले

वसंत तो बहरला अन् मेघ दाटलेले


हा स्पर्श तुझा सखीये मज खुणावितो आज

खुल्या तुझ्या केसुंचा शोभून दिसे साज

हरवून जातो मीही खुळ्या तुझ्या रुपात

बाहुत माझ्या शिरण्या का दाटलेली लाज


सखे बोलकी हो ओठातूनी मुक्या या

तुझे शब्द ऐकण्याला हे अधर आतुरलेले 


धागे हे रेशमाचे कसे ते गुंतलेले

वसंत तो बहरला अन् मेघ दाटलेले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance