बोलायचे आहे बरेच काही
बोलायचे आहे बरेच काही
बोलायचे आहे बरेच काही
जगाचे बंध अडवत आहेत.
अबोल राहणे माझा पेशा नव्हे
पण मी स्वतःला घडवत आहे.
किती काळ सहन करावा
अजून तुझ्या विरहात.
शब्द माझे मृत पावतात
माझ्याच आत अंतरात.
तुझे अबोल राहणे माझा
श्वास कोंडून टाकत आहे.
पाश सारे तोडून यावे
तुझ्या सवे वाटत आहे.
वाटा असतील काटे भरल्या
नशीबही काटेरी टोचत आहे.
परतीची वाट तुझी पाहता
धीर सुटू पाहतो आहे.
पुरे झाले सारे आता,
पुरे झाल्या साऱ्या व्यथा.
शब्द ऐकण्या व्याकुळ तुझा
सांगतो ऐक माझ्या कथा.
नाव तुझे ओठी घेता
श्वास माझा वाढतो आहे.
खोट्या जगाच्या खोट्या प्रथा
आज मोडून काढतो आहे.