कातरवेळी
कातरवेळी
कातरवेळी आयुष्याच्या...!!
सखे गं आपण दोघंच संगतीला...!!
लेकरं गेली घरटे सोडून दूर....!!
जीव हा झाला केविलवाणा....!!
मंद झाले आयुष्य....!!
श्वासही होत चालला मंद....!!
खूप साहिले सुरुंग जीवनी....!!
आता फक्त उरले मनातील तरंग...!!
सखे तुझ्या डोळ्यात....!!
आज उदासी दाटली....!!
मनातील आशाही लोपली....!!
डोळ्यातही स्वप्न नाही उरली....!!
हिशोब करू या कातरवेळी.... !!
आठवणींची सोडू गाथा...... !!
परत जाऊ मागे फिरुनी.....!!
आनंद वेचूया पाखडूनी व्यथा....!!
सुरकुत्यांचा प्रवास देहाचा....!!
आपण दोघे आनंदाने मोजू....!!
साद त्याची येत नाही ,
तोवर सांडलेले आयुष्य वेचू....!!
हे ईश्वरा! तूच आमचा....!!
सोबती ,या बुडत्या वाटेवरती....!!
एक जरीजाईल पुढे निघूनि....!!
तर मालवेल या आयुष्य ज्योती....!!